Share

रामायण – महाभारतनंतर आता ही लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा दाखवली जाणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – रामायण, महाभारत या एकेकाळी तुफानी गाजलेल्या मालिका आज २८ मार्च पासून DD NATIONAL आणि DD भारती वर चालू झाल्या असतानाच आता महाराष्ट्रासह देश-विदेशात गाजलेली व नुकतीच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली प्रचंड गाजलेली मालिका पुन्हा सुरु होत आहे.

ही मालिका म्हणजे झी मराठी या चॅनेल वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’. स्वराज्याचे दुसरे छत्रपती असलेले धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे साक्षात शौर्य, धैर्य, कुशलता, प्रखरता, देशभक्ती, मातृभूमीभक्ती ने भरभलेली गाथाच होय. काही हजारोंच्या मावळ्यांच्या जोरावर ९ वर्षांहून अधिक काळ ५ लाखाहून अधिक फौज घेऊन महाराष्ट्र खुद्द औरंगजेब आला तरी त्याला नमवून वेळोवेळी स्वराज्य खंबीर ठेवले ते म्हणजे स्वराज्याचे धाकलं धनी ‘छत्रपती संभाजी महाराज’.

राज्यातील सर्व शिवभक्तांनी, प्रत्येक नागरिकांनी या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला होता. दरम्यान महिनाभरापूर्वी या मालिकेने निरोप घेतला तेव्हा अक्षरशः अनेकांना रडू देखील सहन झाले नव्हते. या मालिकेत संभाजी महाराजांची भुमिका डॉ. अमोल कोल्हे तर त्यांच्या धर्मपत्नीची व स्वराज्याच्या महाराणी येसुबाई यांची भुमिका प्राजक्ता गायकवाड यांनी साकारली होती. त्याचप्रमाणे अनेक दिग्गज कलाकार देखील या मालिकेत होते. दुपारी ४ ते रात्री ८ असे या मालिकेच्या प्रसारणाची वेळ असेल.

राज्यात कोरोनामुळे लोक धास्तावले आहेत. रुग्णांची संख्या हि १८१ वर पोहोचली असून देखील अनेक नागरिक घरात करमत नाही म्हणुन बाहेर पडत आहेत. सर्वच चॅनेल वरील दररोजच्या मालिकांचा देखील शूटिंग गेले २ आठवडे बंद आहे. त्यामुळे या मालिका देखील आता प्रसरीत होत नसताना करमणुकीसाठी नुकत्याच रामायण व महाभारत या मालिका चालू सुरु करण्यात आल्या असताना आता स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या मालिकेच्या पुनः प्रसरणाने ज्यांनी मालिका बघण्याचे राहिले असेल वा पुन्हा बघायचे असेल त्यांना संधी मिळाली आहेच.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!