Share

दुध दरवाढीसाठी स्वभिमानीचे आक्रमक आंदोलन

Published On: 

कोल्हापूर : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.

दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात

शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले.

राज्यात गाईच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. हा दर खूपच कमी असल्याने सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. देशांतर्गत दूध दर नियंत्रित राहण्यासाठी दूध पावडरीची आयात बंद करावी, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानीचे आंदोलन होण्यापूर्वीच सोमवारी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यभर आंदोलन करुन दूध दराचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने याकडे लक्ष न दिल्याने हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

‘राम लल्ला हम आयेंगे’, राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!