Share

मंदिरात जाण्यासाठी घरातून निघालेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मंदिरात जाते म्हणून घरातून निघालेल्या ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आज मंगळवारी सकाळच्या दरम्यान एन-१ परिसरातील महादेव मंदिराच्या मोकळ्या जागेत आढळला. मृतदेहाच्या डोक्याला, पोटाला, हाताला जखमा आढळून आल्या. त्या सोमवारी दुपारपासून बेपत्ता होत्या. राधाबाई अंकुश शेजुळ (६०, रा.बळीराम पाटील शाळेजवळ, एन-९ सिडको) असे मृतेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राधाबाई सोमवारी दुपारी मंदिरात जाते म्हणून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, रात्र झाल्यावर देखील त्या घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतू त्यांनी फोन उचलला नाही. नातेवाईकांनी रात्रभर त्यांचा शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत.

आज सकाळी काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी एन-१ परिसरात गेले असता तेथे राधाबाई या रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या. ही माहिती नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. त्यांना रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!