Share

Sushma Andhare | “त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर…”; सुषमा अंधारेंचा निशाणा कुणावर?

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करत आज पुण्यात बंद पाळण्यात आला आहे. डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) देखील या मोर्चात सहभागी झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकस आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली एका-एका राजकारण्याकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय,” असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपच्या नेत्यांकडून जाणूनबूजून महारपुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपला ऐकायचे नसेल तर आम्ही असं समजू की भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे. 17 मार्चला आमचा सर्वपक्षीय मोर्चा मुंबई येथे आहे. आम्ही सर्व महापुरुषांच्या सन्मानार्थ एकत्र येणार आहोत. पुण्यातून या बंदला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “भाजपचं शिवरायांवरचं प्रेम बेगडी आहे. त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर त्यांच्या खुर्च्या हिसकावल्या पाहिजेत. यांच्या खुर्च्या हिसकावणे हा सर्वात मोठा आंदोलनाचा इशारा असेल.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!