टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भविष्यात एकत्र येणार आहेत. दोन्ही पक्ष आता थकले आहेत. त्यामुळे लवकरच विलीनीकरण कराव लागणार आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या वक्तव्याचे खंडन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जळगाव येथील पत्रकारांशी आज शरद पवार बोलत होते. सुशीलकुमार शिंदे हे आपल्या पक्षाबद्दल बोलू शकतात. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे आणि मला त्याबद्दल अधिक माहिती आहे. त्यामुळे मी काही यावर बोलणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच यावर अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत असं आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दोन दशकांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार याबद्दल विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशात प्रचाराची रणधुमाळीदेखील सुरू झाली आहे. अशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. आमच्या मनात खंत आहे त्यांच्याही (पवारांच्या) मनात खंत असेल मात्र ते बोलून दाखवत नाहीत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बोलून दाखवतील. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181877088829071360?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181871309682139136?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

