पटना : भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लालू यादव हे एनडीएच्या आमदार फोन करून फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच ते एनडीए आमदारांना मंत्री बनवण्याचीही ऑफर करत असल्याचे मोदी म्हणाले आहेत.
लालू यादव ने दिखाई अपनी असलियत
लालू प्रसाद यादव द्वारा NDA के विधायक को बिहार विधान सभा अध्यक्ष के लिए होने वाले चुनाव में महागठबंधन के पक्ष में मतदान करने हेतु प्रलोभन देते हुए। pic.twitter.com/LS9968q7pl
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) November 25, 2020
चारा घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यांच्यावर झारखंडमध्ये एकुण पाच प्रकरणे सुरू आहेत. यापैकी चार प्रकरणात त्यांना शिक्षा मिळाली आहे. सध्या ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत.मात्र लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्री होण्याचं आमिष दाखवत आहेत, असा आरोप सुशील मोदींनी केला आहे.
जेव्हा त्यांनी संबंधित मोबाइल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला. ‘लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याच घृणास्पद कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही’, असं सुशील मोदींनी लालूंना फोनवर सांगितलं. ट्विट करून सुशील मोदींनी यासंदर्भात माहिती दिली.
लालू प्रसाद यादव यांनी एनडीए आमदारांना केलेल्या कॉलची ऑडिओ रेकॉर्डिंगही मोदी यांनी ट्विट केली आहे. ज्यात लालू प्रसाद यादव सभापती निवडणुकीत एनडीएच्या आमदारांना पाठिंबा देण्याचे सांगत आहेत. कोरोना झाल्याचे सांगून गैरहजर राहावे, असा सल्ला लालू प्रसाद यादव आमदारांना देताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारतात दररोज नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 40,000 पेक्षा कमी झाली ?
- ‘मंदिर विषयावर शुद्र राजकारण करणं योग्य नाही,पण निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही’
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत’
- 69 हजार पेट्रोल पंपांवर किमान एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग किऑस्क स्थापन केले जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

