🕒 1 min read
अबुधाबी : गेल्या चार वर्षांपासून भारतीय संघाचं दार ठोठावनारा सुर्यकुमार यादवसाठी अखेर भारतीय संघाचे दरवाजे उघडले आहेत. मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयपीएलच्या या मोसमात धडाकेबाज कामगिरी केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करतोय. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत.
दरम्यान, बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली गेली आहे. यातच सूर्यकुमार यादव याला देखील संधी देण्यात आली आहे.
पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबईला यंदा ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आलं. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल संपली असली तरी देखील या संघातील 6 खेळाडूंची मोठी परीक्षा आगामी काळात होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार असून त्यासाठी टीम इंडियामध्ये या सर्वांची निवड झाली आहे. यातच महान क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकर याने सूर्यकुमार यादव हा टी20 वर्ल्ड कपसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचं म्हंटलं आहे.
Surya was adjudged the Dressing Room Player of the Match for his ???? knock of 82 ????
Watch out for Sachin's special message for Sky at the end! ????????#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @surya_14kumar @sachin_rt pic.twitter.com/CXZtDmegtN
— Mumbai Indians (@mipaltan) October 9, 2021
सूर्यकुमार यादवनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्यकेलेल्या आक्रमक खेळीनंतर त्याला ड्रेसिंग रुमचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी सचिनही उपस्थित होता. याचा एक व्हिडीओ मुंबईनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिननं सूर्याचं आक्रमक खेळीबद्दल अभिनंदन केलं आहे तसंच त्याला आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी शुभेच्छाही दिल्या. शुभेच्छा देताना सचिन म्हणाला, ‘आगमी काळात तुझी भूमिका आणखी महत्त्वाची असेल. सचिनचा इशारा आगामी टी20 वर्ल्ड कपकडे होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
