Share

धनंजय मुंडे तोडपानी करणारे नेते ते माझ्यावर काय आरोप करणार : सुरेश धस

Published On: 

प्रतिनिधी/अक्षय पोकळे :धनंजय मुंडे हे स्वतः तोडपानी करणारे नेते आहेत. आतापर्यंतची धनंजय मुंडे यांची कारकीर्द पाहिली तर ते कायमच तोडपानी करत आले आहेत. त्यांनी माझ्यावर पैसे केलेल्या आरोपांवर काळं कुत्रं देखील विश्वास ठेवणार नाही असा पलटवार माजी आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

आष्टी मध्ये बाळासाहेब आजबे यांच्या राष्ट्रवादी पार्टीत प्रवेश सोहळ्यात धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते . सुरेश धस यांना आष्टी मतदार संघासाठी काहीच करायचं नाही फक्त स्वतःची खळगी भरण्यासाठीच धस भाजपात गेले असून धस यांनी बीड जिल्हा परिषद निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या पंकजा मुंडे यांच्याकडून तब्बल १५ कोटी रुपये घेतले व जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला साथ दिली असल्याचा गौप्य स्पोट विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला केला होता.

धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप फेटाळून लावताना धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोडपानी करणारे नेते असल्याचा पलटवार केला .मुंडेनी विधीमंडळात कोणते कोणते विषय मांडले आणि त्यावर किती प्रश्न तडीस नेले हे त्यांनी एकदा जनतेला सांगावे. त्या सभेत अर्धे माझेच लोक उपस्थित होते. त्याचबरोबर बाळासाहेब आजबे यासारख्या भंगार लोकांबद्दल मी काहीच बोलणार नाही त्यांची लायकी देखील नाही माझ्यावर टीका करण्याची त्यामुळे यांना मी उत्तर देणार नाही. अशी जोरदार टीका धस यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!