टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर खा. सुप्रिया सुळे या देखील राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रीय होताना दिसत आहेत. बुधवारी खा. सुप्रिया सुळे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. या भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाल्याच सांगितल जात आहे. याबाबतचे वृत्त ‘सरकारनामा’ ने प्रसिद्ध केले आहे.
सुळे आणि गांधी यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात होते. मात्र भेटी नंतर खुद्द सुप्रिया सुळे यांनी भेटीबाबतचा खुलासा केला. राहुल गांधींसोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळ, सरकारकडून होत असलेला हलगर्जीपणा आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा झाली, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये उडी घेतल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. कारण आतापर्यंत राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीची रणनीती ही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार ठरवत असत. पण आता सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीतून मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचं दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

