🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत, तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. उद्या दि. 17 जुलैला दुपारी 12 च्या सुमारास ढाले यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहेत.
राजा ढाले यांच्या निधनाने सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राजा ढाले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील झुंजार पँथर राजा ढाले यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने संघर्षाचे एक वादळ शांत झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील झुंजार पँथर राजा ढाले यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने संघर्षाचे एक वादळ शांत झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2019
राजा ढाले यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर खासकरून दलित पँथर चे कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील ढाले यांच्या निधनाचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
