🕒 1 min read
नवी दिल्ली : कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बुधवारी लोकसभेत बोलताना आज अचानक शरद पवार उलट बोलत असल्याची अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. यावेळी सभागृहात खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दरम्यान सुप्रिया सुळेंनी मोदींनी केलेल्या या टीकेला उत्तर दिले आहे.
“आमच्या पक्षाच्या प्रमुखांवर मोदींनी टीका केली. त्यांना उभे राहून मी थांबवू शकत होते, पण ही आमची संस्कृती नाही. मला काही कागदपत्रे, तथ्य समोर मांडायचे आहे. मोदी हे भाजपचे सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला त्यांनी दिला. पण यावेळी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अमंलबजावणी केली जावी हे त्यांनी वाचले नाही.” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“यु-टर्न हा शब्द मोदींनी वापरल्यामुळे या सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल मला सांगायचे आहे. जीएसटी मनमोहन सिंग सरकारने आणले होते, तेव्हा याला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता. आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयके आम्ही आणली. आमचा बदल झाला पाहिजे यावर विश्वास आहे. ही विधेयके जेव्हा आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करुन, त्यांचे मत मागवूनच कायदे करण्यात आले. कोरोना संकटात नोकरी गेलेल्यांना मनरेगामुळे रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता, आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा नेमका कोणता टर्न आहे मला माहिती नाही.” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार अर्थसंकल्पावरील प्रश्नांना राज्यसभेत उत्तर
- गावकऱ्यांच्या मागणीची सोनू कडून दखल; पकडून दिले वानर…
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- राज्यपालांना विमान नाकारलं, अजित पवार म्हणतात…
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
