Share

उसाचे ट्रॅक्टर उलटले, जालना रोडवरील वाहतूक तासभर खोळंबली

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : उसाने भरलेली ट्रॉली घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरचे समोरील चाक फुटल्याने ते उलटले. हा अपघात बुधवारी (दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिडको उड्डाणपुलावर घडला. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी वेळीच उड्डाणपुलावर धाव घेत वाहतूक पुलाखालून वळवली. त्यानंतर तासाभराने उलटलेला ट्रॅक्टर बाजूला करून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत केली.

उसाने भरलेली ट्रॉली घेऊन ट्रॅक्टर क्रमांक (एमएच-२०-एएस-३८९०) हा सिडको उड्डाणपुलावरून चिकलठाण्याकडे जात होता. सिडको उड्डाणपुलावरून ट्रॅक्टर जात असतांना ट्रॅक्टरचे समोरील चाक अचानक फुटल्याने वेगात असणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली रस्त्यावरच उलटली.

पुलावर उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्यामुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन सिडको उड्डाणपुलावरील वाहतूक पुलाखालून वळवली. जवळपास तासाभराने पोलिसांनी उलटलेला ट्रॅक्टर बाजूला करून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!