Share

अंतिम वर्षाच्या परीक्षेची सक्ती का?’युजीसी’ला सुप्रीम कोर्टाने दिले ४८ तासांत उत्तर देण्याचे आदेश

Published On: 

दिल्ली: राज्यासह देशभरात गेले ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने कहर केला आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांसह  शैक्षणिक क्षेत्रावर देखील झाला आहे. सामान्यतः एप्रिल, मे हे विद्यापीठांसह, शालेय शिक्षणाच्या परीक्षांचे महिने असतात परंतु या वर्षी कोरोना महामरीमुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, अजूनही परिस्थिती आटोक्यात नसून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.हे सर्व लक्षात घेता युजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेची काल सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली.

राज्य सरकारने देखील विद्यापीठांच्या अंतिम वर्षासह सर्व परीक्षा रद्द करण्याचे आदेश काढले होते. मात्र, युजीसीने जाहीर केलेल्या नियमावली नुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा या सप्टेंबर महिन्याअखेर पर्यंत घेतल्या जाव्यात आदेश राज्य सरकारसह विद्यापीठांना दिले होते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालक देखील प्रचंड संभ्रमात असून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर, विद्यार्थ्यांची बाजू घेत त्यांच्या हितासाठी युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युजीसीच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

‘महाजॉब्स’ पोर्टल नंतर आता ऍपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लाँच!

युजीसीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे उपस्थित होते. त्यांनी, परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचे सांगत जे विद्यार्थी परीक्षा आता देऊ शकत नाहीत त्यांची नंतर परीक्षा घेण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे ऍड. मेहता यांनी संगीतले.  तर, पुढील दोन दिवसात यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश खंडपीठाने युजीसीला दिले आहेत. यानंतर आता २९ जुलैपर्यंत उत्तर सादर केले जाईल अशी माहिती ऍड. मेहता यांनी दिले आहे.

आनंदाची बातमी : राज्यात प्रथमच एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

तसेच, युवसेनेसह देशातील ३१ विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकांचे देखील यावेळी विचार करण्यात आला. त्यातील काही विद्यार्थी हे कोरोना बाधित आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी या राज्यांनी देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

अमोल मिटकरींची किमया तब्बल अडीच वर्षांनंतर गाव झालं प्रकाशमय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!