औरंगाबाद: सोयाबीन पेरलं पण उगवलं नाही अशी हताश परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणेच बोगस असल्याचे समोर आले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी या बियाणं उत्पादक व विक्रेत्यांविरोधात हजारो तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांवर काय कारवाई होणार तसेच नुकसान भरपाई मिळणार का याची फक्त आशाच शेतकऱ्यांना लागली आहे. तर, काही दिवसांपूर्वी कारवाई होण्यासाठी लातूरमध्ये मनसेने खळ्ळ-खट्याक देखील केले होते.
यानंतर महाबीजसह सोयाबीन कंपन्यांवर ४६ फौजदारी गुन्हे दाखल केल्याची माहिती कृषी विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली होती. दरम्यान,बोगस सोयाबीन बियाणे उत्पादक, विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे आणि न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी २६ जून रोजी दिले होते.
जनतेच्या आशीर्वादामुळे आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याने कोरोनावर केली मात
या प्रकरणात काही बियाणे उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्यापुढे सुनावणी झाली असून पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत, या संदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
आता खरी कसोटी, गाफील राहू नका, उद्धव ठाकरेंचे आवाहन
लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नगर जिल्ह्यांमध्ये बनावट सोयाबीन बियाणे विक्री झाली असून, त्यांची उगवणच झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात अनेक वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांमधून, लागवडीनंतर सोयाबीन उगवण झालीच नसल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्याची दखल घेत खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. प्रकरणात ऍड. पी. पी. मोरे यांची अमायकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
दूध दरवाढ न केल्यास मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांना दुधाचा अभिषेक घालू – पूजा मोरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

