सुरत- गुजरातमधील महिला पोलिस सुनीता यादव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोग्यमंत्र्याच्या मुलाला जनता कर्फ्यूमध्ये अडवल्यानं सुनिता चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र वरिष्ठांच्या दबावामुळे सुनितानं आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या घडलेल्या प्रकारावर आता सुनितानं एक धक्कादायक विधान केलं आहे. सुनिता फेसबुक लाईव्हवर संवाद साधताना म्हणाल्या की, आठ तारखेच्या रात्री माझ्याबरोबर निर्भया कांड सारखा प्रकारही घडला असता. पोलिस दलात अनेक अधिकारी आहेत ज्यांना पूर्ण तन्मयतेनं काम करण्याची इच्छा असते. मात्र वरिष्ठ अधिकारी त्यांना काम करू देत नाही. असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
सुरतमध्ये रात्री १० ते पहाटे ६ च्या दरम्यान नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जनता कर्फ्यूचंही आयोजन करण्यात आलं आहे. यावेळेस राज्यातील आरोग्यमंत्री कुमार कानानी यांचे काही समर्थक नियमांचे उल्लंघन करत रस्त्यावर फिरत होते. याठिकाणी तैनात सुनीता यांनी समर्थकांची गाडी अडवून चाव्या ताब्यात घेतल्या. यानंतर यातील काही लोकांनी कानानी यांचा मुलगा प्रकाशला मदतीसाठी बोलावलं. प्रकाश लागलीच घटनेच्या ठिकाणी दाखल झाला.
यावेळी दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. सुनितानं आरोग्यमंत्र्यांनाही कायद्याचा पाठ शिकवत चांगलंच धारेवर धरलं. मात्र सुनिताच्या वरिष्ठांना तीचं हे वर्तन न अडवल्यानं तीला घरी जाण्यास सांगितलं. सुनितानेही मागचा पुढचा विचार न करता आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. मी कुणालाही घाबरत नसल्याचं तिने सांगितले आहे. सुनिताच्या या धाडसाचं सोशल मिडीयावर चांगलच कौतुक होत आहे. तसेच तीच्या समर्थनासाठी #Isupprot SunitaYadav हा हॅशटॅगही नेटिझन्सकडून चालवण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
सचिन पायलट यांना समर्थन करणे भोवले; काँग्रेसने राष्ट्रीय प्रवक्त्याचे केले निलंबन
आरसीएफ मधील नोकर भरतीमध्ये स्थानिक,भूमिपुत्रांना प्राधान्य द्या – प्रविण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

