मुंबई: राजस्थानमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये गेहलोत विरुद्ध सचिन पायलट अशी उभी फूट पडलेली पाहायला मिळाली होती. यानंतर सचिन पायलट यांनी समर्थक आमदारांना सोबत घेऊन थेट दिल्ली गाठली होती. ज्यामुळे राजस्थानचे देखील मध्य प्रदेश होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता सचिन पायलट यांचे अनेक काँग्रेस नेते समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे.
तर, पक्षाविरुद्ध कारवाया आणि शिस्त भंग केल्याचे कारण देत काल रात्री राष्ट्रीय माजी प्रवक्ते संजय झा यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. कोंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय झा यांचे निलंबन केले आहे. काल त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये, ‘ काँग्रेसचा मोठा शत्रू हा भाजपा नसून स्वतः काँग्रेसच आहे आणि काँग्रेसच स्वतःला संपवत आहे,’ असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी याआधी देखील ट्विटरवरून काँग्रेसच्या अनेक भूमिकांवर भाष्य केले होते.
Shri Sanjay Jha has been suspended from the Congress Party with immediate effect for anti-party activities and breach of discipline. pic.twitter.com/TaT0gWbCc7
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 14, 2020
दरम्यान, त्यांनी सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्वीट्स करत त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. झा म्हणतात, ‘ पाच वर्षे सचिन पायलट यांनी स्वतः च रक्त, अश्रू, घाम, परिश्रम हे सर्व काँग्रेसला २०१३-१८ दिले होते. काँग्रेसच्या वाईट २१ जागा कामगिरी ते १०० जागा हे त्यांनी केले.’ तर पुढे त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य करत उपरोधिक टीका देखील केली होती. तर, काँग्रेसने या सर्व वक्तव्यांनातर संजय झा यांचे पक्षातून निलंबन केले आहे. यावर त्यांनी माझ्या रक्तात काँग्रेस आहे असे देखील सांगितले.
For five years Sachin Pilot gave his blood , tears, toil and sweat for the Congress party between 2013-18. The Congress came back from a wretched 21 seats to 100.
We just gave him a performance bonus. We are so meritocratic. We are so transparent.
— Sanjay Jha (@JhaSanjay) July 14, 2020
सचिन पायलट यांचे प्रिया दत्त आणि जितीन प्रसाद यांनी देखील सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. प्रसाद यांनी, ‘ पायलट यांनी इतके वर्ष समर्पण भावाने काम केलं आहे हे नाकारू शकत नाही.’ यासोबतच सर्व ठीक होईल अशी आशा देखील व्यक्त केली होती. तर प्रिया दत्त यांनी, ‘ ‘अजून एका मित्राने पक्ष(पार्टी) सोडली’,अशा शब्दांत भावना व्यक्त करत पुढे त्यांचे समर्थन देखील केले आहे.
ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘ अजून एका मित्राने पक्ष सोडला, सचिन आणि ज्योतिरादित्य हे सहकारी आणि चांगले मित्र होते. दुर्भाग्याने आमच्या पक्षाने दोन दिग्गज युवा नेत्यांना गमावलं आहे. महत्वाकांक्षी असणं हे चुक नाही, असं माझं मत आहे. त्यांनी अत्यंत कठीण काळात खूप मेहनत घेतली आहे,’ असे म्हणत भावना व्यक्त केल्या होत्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

