मुंबई : कपिल शर्मा हे टिव्ही जगतातील एक नावाजलेले नाव. लाफ्टर चॅलेंज स्पर्धेत स्पर्धक म्हणून ते कपिल शर्मा शो अशी त्याची उत्तुंग भरारी सर्व प्रेक्षकांनी अनुभवली आहे. मात्र प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्यावर त्याचा उद्धटपणाही प्रेक्षकांनी बघितला. त्याचा राग करणारे अनेक टिव्ही जगतात आहे. यात आता सुमोना चक्रवर्तीचेही नाव जोडले गेले आहे.
सुमोनने टिव्ही जगतात अनेक भूमिका केल्या आहेत. मात्र ती प्रसिद्धीझोतात आली ते कपिल शर्मा शो द्वारे. या कार्यक्रमात ती कपिल शर्माच्या बहुतेक वेळा बायकोच्या भूमिकेत दिसत असते. या कार्यक्रमात तिच्यावर कपिल शर्मा करत असलेल्या विनोदामुळे ती त्याच्यावर रागावली होती. तिने वैतागुन अनेकदा मनातल्या मनात कपिल शर्माला शिव्या दिलेल्या आहेत. असे सुमोनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्मा सुमोनाला अनेकदा तिच्या शरिरावरुन टोमणे मारायचा. तीच्या ओठाना बदकाची उपमा देत सतत अपमान करायचा. यामुळे तिचा अत्मसन्मान दुखावला जायचा. पण त्यावेळी पैशामुळे तिने तो अपमान सहन केला. नतंर तिला याची सवय झाली. यामुळे याबाबतीत तिने कधीच तक्रार केली नाही. याबद्दल विचार करताना आजही मनाचा गोधंळ उडत असल्यामुळे मी याचा विचार करणे थांबवले असल्याचे तिने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी
- ‘५१८ चित्रपटांमध्ये काम करूनही मला ओळखल नाही’ ; डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीये’ ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- बीडमध्ये शिवसेनेच्या वाघांत राडा, जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीवरून दोन गटात हाणामारी
- राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

