Share

नगरच्या राजकारणाचा सुसंकृत किस्सा : ‘तोपर्यंत’ तरी सुजय विखे अन् संग्राम जगतापांचा याराना…

Published On: 

अहमदनगर : नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या कामाच्या आड जे कोणी येईल? त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. आज नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार आणि लोकसभेला विखे यांचे प्रतिस्पर्धी असलेले संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तरी एकमेकांविरोधात प्रचार करणार नाही. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संग्राम जगताप व आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाही. शेवटी नगर शहरातील प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असे सुजय विखे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ नाही तर भाजपामुळे शिवसेनेचे आमदार-खासदार निवडून आले: नारायण राणे

तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप आणि सुजय विखे हे एकमेकांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. तेव्हापासून नगरच्या या दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद होता. मात्र निदान नगरच्या विकासाच्या प्रश्नी तरी हे दोन्ही युवा नेते एकत्र आल्याने नगरच्या सुसंकृत राजकारणाचे दर्शन राज्याला पुन्हा झाले आहे.

हीच आहे का पक्षांतर्गत लोकशाही? निलंबित कॉंग्रेस नेत्याने थोरातांवर डागली तोफ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!