मुंबई: राजस्थानमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये गेहलोत विरुद्ध सचिन पायलट अशी उभी फूट पडलेली पाहायला मिळाली होती. यानंतर सचिन पायलट यांनी समर्थक आमदारांना सोबत घेऊन थेट दिल्ली गाठली होती. ज्यामुळे राजस्थानचे देखील मध्य प्रदेश होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता सचिन पायलट यांचे अनेक काँग्रेस नेते समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे.
तर, पक्षाविरुद्ध कारवाया आणि शिस्त भंग केल्याचे कारण देत राष्ट्रीय माजी प्रवक्ते संजय झा यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. कोंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय झा यांचे निलंबन केले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये, ‘ काँग्रेसचा मोठा शत्रू हा भाजपा नसून स्वतः काँग्रेसच आहे आणि काँग्रेसच स्वतःला संपवत आहे,’ असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी याआधी देखील ट्विटरवरून काँग्रेसच्या अनेक भूमिकांवर भाष्य केले होते.
Dear Mr Balasaheb Thorat @INCIndia
I saw your notice suspending my Congress membership on a TV channel for ' anti-party activities'. No show-cause notice and opportunity to reply was given. Internal democracy?
Kindly list specific instances where I have indulged in sabotage.
— Sanjay Jha (@JhaSanjay) July 16, 2020
काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर पक्षाचे माजी प्रवक्ते संजय झा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारले आहेत. ‘हीच आहे का पक्षांतर्गत लोकशाही?’ असा सवाल झा यांनी थोरातांना विचारला. ‘बाळासाहेब थोरात, टीव्ही चॅनेलवर ‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याबद्दल काँग्रेसने माझे सदस्यत्व रद्द केल्याची तुमची नोटिस मी पाहिली. कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता, उत्तर देण्याची संधीही दिली गेली नाही. हीच का अंतर्गत लोकशाही? कृपया मी ज्या-ज्या ठिकाणी राजकीय शिस्तभंग केले, त्या विशिष्ट घटनांची यादी द्या’ असे ट्वीट संजय झा यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?
आघाडीत बिघाडी : सरकार आघाडीचे आहे याची काळजी घ्या, राहुल गांधींच्या खास व्यक्तीने खडसावले
ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना, मुंबईत गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

