टीम महाराष्ट्र देशा : सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नगरचे खासदार सुजय विखे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न या अधिवेशनात मांडले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे बळीराजा अडचणीत आहे. अशातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही. या प्रशावर बोलताना ‘देशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून द्यावी अशी मागणी विखे यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी ‘सध्या उत्पादित केलेल्या कांद्याला निर्यात करण्याची परवानगी दिली तर शेतकऱ्यांंना त्याचा निश्चितच लाभ होईल. सरकारने मागील काही दिवसांपासून निर्यात अनुदान बंद केल्याने शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत केंंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून निर्णय करावा आशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.
दरम्यान, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनीही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा तसेच आयात आणि निर्यात ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि त्यांच्या हितासारखी असली पाहिजे अशी मागणी लोकसभेत केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

