Share

जुगारात पैसे हरल्याच्या नैराश्यातून परराज्यातील तरुणाची आत्महत्या

Published On: 

औरंंगाबाद : मोबाइलवरील जुगारात पैसे हरल्याच्या नैराश्यातून मध्यप्रदेशातील चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पळशीतील भुजंगराव पळसकर यांच्या घरात घडली. राजेश सुभाषप्रसाद साहु (वय ३०, रा. पळशी, मुळगाव खंडवा, नर्मदानगर, मध्यप्रदेश) असे चालकाचे नाव आहे.

गेल्या सहा महिन्यांपुर्वी कामाच्या शोधात राजेश साहु हा पत्नीसह शहरात आला होता. तो समृध्दी महामार्गावर चालक म्हणून काम करायचा. घराच्या गच्चीवर जाऊन तो नेहमी मोबाइलवर जुगार खेळत होता. पत्नी त्याला वारंवार गच्चीवर बोलावण्यासाठी जायची. मात्र, तो नेहमी तणावात असल्याचे दिसायचा. अशात तो ऑनलाईन जुगारात तब्बल अडीच लाख रुपये हरला होता.

त्याच्या नैराश्यातून त्याने मध्यरात्री गच्चीतील जिन्यात असलेल्या सळईला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर पत्नीने नागरिकांच्या मदतीने त्याला बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!