🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: ब्लॅकहेड्स blackheads ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये समान पातळीवर आहे. तरी त्याचे प्रमाण कमी जास्त असले तरी प्रत्येकाला ब्लॅकहेड्समुळे खूप समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यांचे ओपन पोर्स असतात त्यांना हे प्रॉब्लेम कामी होतात पण ज्यांचे पोर्स मोठे असतात त्यांना ब्लॅकहेड्स जास्त असण्याची शक्यता असते. कारण चेहऱ्यावरील हे पोर्स मोठे असल्यामुळे धूळ,तेल इत्यादी गोष्टींमुळे त्यामध्ये घाण साचते आणि त्याचे रूपांतर ब्लॅकहेड्स मध्ये होते. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हे आपल्याला अस्वच्छ लुक देतात. त्यामुळे अनेक जण हे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन अनेक शस्त्रक्रिया करत असतात. शस्त्रक्रियेचा अनेकदा दुष्परिणाम होऊन त्याचे रूपांतर डागांमध्ये होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या द्वारे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत. हे घरगुती सोपे उपाय वापरून तुम्ही ब्लॅकहेड्स दूर करू शकता.
ब्लॅकहेड्स काढण्याच्या घरगुती पद्धती
- सर्वप्रथम आपला चेहरा चांगला फेस वॉशने धुऊन घ्या. त्यानंतर चेहऱ्याचे स्क्रब करा. स्क्रब करण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब तयार करू शकता किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असलेले स्क्रब सुद्धा वापरू शकता. स्क्रब करताना ज्या भागात जास्त काळे डाग आहेत त्या ठिकाणी हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तयार होऊ लागते.
- हे स्क्रब चेहऱ्यावर थोडावेळ तसेच राहू द्या. व्यवस्थित स्क्रब झाल्यानंतर तुम्हाला वाफ घ्यावी लागेल. वाफ घेत असताना तुम्हाला हळूहळू चेहऱ्यावर मसाज करावी लागेल. वाफ घेतल्यानंतर ब्लॅकहेड बरेच प्रमाणात मऊ होतील आणि ते काढायला फार कष्ट लागणार नाही.
- चेहरा पुरेसा मऊ झाल्यावर चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी स्क्रब आणि वाफे सोबत एक साधन (ब्लॅकहेड्स टूल) वापरावे लागेल. पिन आकाराच्या ब्लॅकहेड्स टूलच्या मदतीने तुम्ही छिद्रात अडकलेले ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स दोन्ही काढू शकतात.
- ब्लॅकहेड टूल वापरून झाल्यानंतर चेहऱ्यावर तुमचा आवडता फेस मास्क लावा. कारण फेस मास्क लावल्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाऊन धुळीचे छोटे कणही बाहेर पडतील.
- फेस मास्क झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. सगळ्यात शेवटी तुमच्या आवडत्या मॉइश्चरायझर ने चेहऱ्यावर मसाज करा. शक्यतो गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर क्रीम लावा. ब्लॅकहेड्स काढताना चेहऱ्यावरील पिंपल्स फुटणार नाही याची काळजी घ्या.
- याप्रक्रिये सोबतच तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेले ब्लॅकहेड्स रिमुव्हल स्ट्रिप्स देखील वापरू शकता. पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते त्यामुळे ते वापरताना काळजी घ्या.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Deshmukh । उद्धव ठाकरेंची खेळी, संजय देशमुखांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश; संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान
- Delhi Tour Guide | देशाची राजधानी दिल्ली फिरायला गेला तर ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या
- Aravind Sawant | “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची कुठे आहेत?”; अरविंद सावंतांचा फडणवीसांना खोचक सवाल
- Bhaskar Jadhav । ‘तो’ हल्ला सरकारच्याच सहकार्यानं आणि सरकारच्याच माध्यमातून गुंडांनी केलाय; जाधवांचा थेट आरोप
- Diwali Rangoli 2022 | दिवाळीमध्ये आकर्षक रांगोळी काढायची असेल तर, ‘या’ टिप्स फॉलो करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
