Share

Sanjay Deshmukh । उद्धव ठाकरेंची खेळी, संजय देशमुखांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश; संजय राठोडांविरोधात तगडे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Deshmukh । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजप (BJP) सोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केलं. यावेळी शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर सेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. मात्र अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने वातावरण तयार झालेलं दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील बडे नेते आता शिंदे गटातील आमदारांबाबत भाकीत करू लागले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का दिला आहे.

आज यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ दिले जात आहे. दरम्यान, संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पक्षप्रवेशानंतर देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया –

आपण ठाकरे गटात प्रवेश का करत आहोत? याचं कारण संजय देशमुख यांनी सांगितलं आहे. मी आधी शिवसैनिकच होतो. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो. सध्याची जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, तिच्या पार्श्वभूमीवर मी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने काही लोकांना सर्व काही देऊन देखील त्यांनी शिवसेनेला धोका दिला. ते पक्षातून बाहेर पडले. हे पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांचा देखील आग्रह होता. त्यामुळे आज शेकडो कार्यकर्त्यांसह हाती शिवबंधन बांधणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!