Share

दिवे पेटवताना लाज वाटते पण मंत्रालयाच्या फाईल जाळल्या तेव्हा तोंडाला फेविकॉल लावला होता का?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले.

यासोबतच, आज ५ एप्रिलला, जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, आज रविवार ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी कोरोना गांभीर्याने घेत नसल्याची टीका केली. तसेच मोदींनी डॉक्टर , नर्स यांना संरक्षण साहित्य उपलब्ध करून देणे, गरीब लोकांना खाण्यासाठी अन्न नाही, आर्थिक व्यवहार थांबल्याने अडचणीत आलेल्यांना आधार देणे, राज्य सरकारांना अधिक आर्थिक मदत करणे अशी ठोस पावलं सोडून इतर गोष्टी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. मुनगंटीवारांनी एक व्हीडीओ टाकला आहे आणि त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणि कॉंग्रेसच्या ट्वीटरला मेनशन केलं आहे.

सुधीर मुनगंटीवारांनी या व्हीडीओमध्ये म्हणाले, काहींना दिवे पेटवायला लाज वाटते, पण मंत्रालय पेटवलं तेव्हा लाज नी वाटली. आता माजगावच विक्रीकर भवन पेटवलं तेव्हा लाज नी वाटली. आता मोदींना देशातील जनता सहकार्य करतय तर यांच्या पोटात दुखतंय. आज दिवे पेटवायला लाज वाटणार्यांनी मंत्रालयात ५८००० फाईल पेटवल्या तेव्हा मात्र १००० किलो फेविकॉल चीटकावा असे ओठ बंद होते.’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!