🕒 1 min read
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारकचं कौतुक करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलाय. यानंतर आता सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता नीती आयोगानंही उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर स्तुतीसमनं उधळली आहेत.
मुंबईचं कोविड व्यवस्थापन हे प्रेरणादायी असल्याचं ट्विट नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलं आहे.तर दुसऱ्या बाजूला मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते मात्र राज्य सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना भाजपचे जेष्ठ नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे तसेच भाजप नेते आणि समर्थकांना खडेबोल देखील सुनावले आहेत.
Judging by Modi’s, and today Union Government Spokesperson’s praise for Mumbai’s tackling of Coronavirus menace, it seems UT has become a model CM. This is what I said first and then Andh& Gandh Bhakts howled like frightened jackals. Where are they now? Back to city sewer?
— Subramanian Swamy (@Swamy39) May 11, 2021
स्वामी म्हणाले, म्हणाले, की पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रवक्त्यांनी आज मुंबई कोरोना विषाणूच्या धोक्यातून निसटल्याबद्दल कौतुक केले आहे. आता असे दिसते की उद्धव ठाकरे एक रोल मॉडेल मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत. मी हे पहिल्यांदा देखील म्हणालो होतो. त्यानंतर अंध आणि गंध भक्तांनी आरडाओरड सुरू केली होती. आता ते अंध आणि गंध भक्त कुठे आहेत? पुन्हा शहरातील गटारात का?अशी चपराक त्यांनी लगावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

