Share

‘सरकारने पास केलेल्या विद्यार्थ्यांना ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणून तर संबोधले जाणार नाही ना?’

Published On: 

मुंबई : आम्हाला ‘करोना ग्रॅज्युएट’ तर संबोधले जाणार नाही ना? आम्हाला अशा नव्या बिरुदावलीने तर ओळखले जाणार नाही ना? ATKT असलेल्या ४० % विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

‘पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्याची काळजी घेणे योग्यच आहे. त्यासोबत त्यांचे शैक्षणिक आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेळीच देऊन सरकारने विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करावे’, ही आमची विनंती,असं शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? याही प्रवेश परीक्षा रद्द करणार काय? हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणा-या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू आहे का? असं देखील शेलार यांनी विचारले आहे.

‘आपलं सरकार हे जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध’

‘मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये ‘हा’ सल्ला पहिल्यांदा सामना संपादकांना द्यावा’

आमचा वेळ केवळ अभ्यास करण्यातच वाया जातोय ; एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!