Share

#coronavirus : ‘परिक्षांबाबत निर्णय होत नाही तोपर्यत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता येणार’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात सध्या १० वी आणि १२ वी सह एपीएससीच्या परीक्षाही सुरु आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करता गर्दी टाळण्यासाठी एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे. ही परीक्षा 30 मार्चनंतर घेण्यात यावी असं सुचवण्यात येत आहे. तसेच घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम थांबवण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

याच पार्श्वभूमीवर असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांसंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहता येणार आहे, असे निर्देश दिले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘१४४ कलम म्हणजेच जमावबंदी लागू करण्याचा विचार पुण्याच्या काही भागात आहे. मात्र त्याबाबत लवकरच आदेश दिले जातील, अशी माहिती नवल किशोर राम यांनी दिली. मॉल्समधील मेडिकल, किराणा आणि भाजीपाला दुकाने सुरु राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘येत्या दोन दिवसात केईम रुग्णालयात नव्या प्रयोगशाळा निर्माण करून रुग्णाची टेस्ट केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, जे जे रुग्णालय ,हाफकीन आणि पुणे येथेही नवी लॅब्स उभारण्यात येणार आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील बेडची क्षमता 100 पर्यंत केली जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसात 1000 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात 400 बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. डॉक्टर रात्रंदिवस आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यांनाही काम करताना अडचण येऊ नये म्हणून सर्व यंत्रणा पुरवली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!