Share

जुन्या वादातून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : पूर्ववैमनस्यातून तिघांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. ही घटना १५ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दर्गा चौकाकडे जाणा-या रस्त्यावर घडली. आकाश राजू मगर (वय १९, रा. शिवाजीनगर) याचे मित्र गणेश आडसूळ, कृष्णा नायकल आणि शुभम पांचाळ यांच्यासोबत जुन्या कारणावरुन भांडण झाले. या भांडणातून तिघांनी मगरला दगडाने मारहाण केली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात २४ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास जवाहरनगर भागात घडली. जवाहरनगर भागातून रात्री दुचाकीवर (एमएच-२०-एफआर-१३८६) जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कार (एमएच-२०-ई-६८८८) चालकाने महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेच्या डाव्या पायाला जखम झाली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीच्या गेटसमोरून दुचाकी लंपास
वॉटर फिल्टर कंपनीत कामाला गेलेल्या कामगाराची दुचाकी चोराने लांबवली. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वासात ते पावणेनऊच्या सुमारास एमआयडीसी वाळुजमधील महावीर चौकात घडली. राहुल रामकृष्ण केंठे (वय २४, रा. साईनगर, सिडको) हा मधुर प्युअर फिल्टर वॉटर या कंपनीत कामाला आहे. त्याने कंपनीबाहेर दुचाकी उभी केली होती. चोराने त्याची दुचाकी अवघ्या सव्वातासाच्या अंतरावर हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!