Share

जिद्द! गावात रेंज नसल्याने डोंगरावर जाऊन ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या ‘त्या’ मुलीची नितेश राणेंनी घेतली दखल

Published On: 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील दारिस्ते येथील गावातील एका मुलीच्या जिद्दीला राज्यभरातून आता सलाम केला जात असून तिच्या अभ्यासाच्या सोयीसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. स्वप्नाली सुतार ही तरुणी ऑनलाईन अभ्यासासाठी गावातील डोंगरावर झोपडीत ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरवत आहे.

12 वी नंतर गावातून पशुवैद्यकीय पदवीच शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली. मुंबईतील दिवा भागात भावांसोबत राहत होती. मात्र, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ती गावी आली. गावात आल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाला. तीचं दारिस्ते हे गाव तसं दुर्गम खेडेगाव असलेला भाग. ऑनलाईन अभ्यास सुरु झाल्याने गावात इंटरनेट मिळत नसल्याने आजूबाजूला, डोंगरात तिने इंटरनेट कुठे मिळत का? याचा शोध घेतला. उंच डोंगरात तिला इंटरनेट मिळालं.

हिंदुस्तानी भाऊला इंस्टाग्रामने दिला दणका;अकाउंट झालं सस्पेंड

दारिस्ते सारख्या दुर्गम भागात राहणारी स्वप्नाली सुतार या तरुणीने गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसतानाही जिद्द, चिकाटी व मेहनत करत पशुवैद्यकीय पदवीचा तिसऱ्या वर्षांचा ऑनलाइन अभ्यास करत आहे. उराशी बाळगलेली जिद्द पूर्ण करत असताना तिला अनेक अडथळे आले, तरीही ते अडथळे पार करून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ती धपडत आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिल्यानंतर हि बातमी वाऱ्याच्या वेगाने राज्यात पसरली.

इंदुरीकर महाराज प्रकरणावर १६ सप्टेंबरला महत्वाची सुनावणी

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी, या तरुणीची दखल घेत तिच्या अभ्यासासाठी लागणारी मदत उपलब्ध करून दिल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे. ” सिंधुदुर्गमधील या कष्टाळू मुलीला गावात नेटवर्क उपलब्ध नसल्याने डोंगरावर जाऊन ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहावे लागत होते, तिला तिच्या हॉस्टेलमध्ये राहायला जायचे होते, जेणेकरून ती अभ्यास करू शकेल. मी तिला लागणाऱ्या  गरजेची पूर्तता केली आहे,ज्यामुळे आता ती तिचे स्वप्न पूर्ण करू शकते”असे ट्विट त्यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ प्रस्तावाला युजीसीचा पाठिंबा?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!