Share

इंदुरीकर महाराज प्रकरणावर १६ सप्टेंबरला महत्वाची सुनावणी

Published On: 

अहमदनगर : पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? याकडे वारकरी सांप्रदायासह त्यांच्या चाहत्यावर्गाचे आहे.

या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हस्तक्षेप अर्ज केल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली. इंदोरीकर यांच्याविरुद्ध बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल झाली होती.

चंदगड तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार मंडलिक

तत्पूर्वी समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी (१५ ऑगस्ट) खासदार डॉ. सुजय विखे यांनी जात त्यांची भेट घेतली होती. यावेळी इंदुरीकर महाराजांनी खासदार विखे यांचा फेटा घालून सत्कार केला. तर विखेंनी त्यांना जय श्रीराम लिहिलेली भगवी शाल घातली. त्यामुळे देशमुखांचा फेटा अन् विखेची जय श्रीरामची शाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

इंदुरीकर महाराजांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी काही राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनीही त्यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत राज्य सरकारने सहानुभूती दाखवायला हवी होती. असे सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही माजी मंत्री विखे यांनी दिली होती.

‘ग्रामीण भागात आरोग्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्रधान्य’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!