ठाणे : कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी केलेल्या आंदोलनात घोषणात मात्र कांद्याची निर्यात बंद करा अशी घोषणा स्वतः ठाणे शहर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलन नक्की कशासाठी आहे याची काहिच कल्पना कार्यकर्त्यांना नसल्याचे सत्य उघड झाले. बराच वेळ चाललेल्या या घोषणाबाजीत गडबड असल्याची बाब, प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यावर यात दुरुस्ती करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून त्यामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ नये यासाठी हे बंदी त्वरित रद्द करावी अशी मागणी ठाणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुजाता घाग यांनी केली.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/667024394210821/
महत्वाच्या बातम्या :
- ‘आम्ही उगाचच 30 वर्ष शिवसेनेच्या प्रेमात पडलो’ शहराच्या नामांतरावरुन ‘औरंगाबादकरांची’ प्रतिक्रिया
- अमरावतीतील श्रमिकांच्या रोजगाराचे साधन नियमित सुरु करा, केंद्रीय मंत्र्यांची मागणी
- संभ्रमात राहू नका, लक्षणे असतील तर चाचणी करा, तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले कळकळीचे आवाहन
- बेरोजगारीवर का बोलत नाही?; वर्षा गायकवाड नवनीत रणांवर भडकल्या
- मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात; उद्धव ठाकरे यांनी पक्षपातीपणाचे राजकारण करू नये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

