Share

मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात; उद्धव ठाकरे यांनी पक्षपातीपणाचे राजकारण करू नये

Published On: 

मुंबई  : इंदुमिल मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाचा नियोजित कार्यक्रम आज रद्द झाला असला तरी या कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळी च्या नेत्यांना निमंत्रण न देता कार्यक्रम आयोजित कारण्याची घाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना का झाली होती? असा सवाल करीत मुख्यमंत्री हे राज्यातील सर्व जनतेचे असतात त्यांनी पक्षपतीपणा करू नये असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केला आहे.

इंदु मिलस्थळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी आंबेडकरी जनते ने लढा दिला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करून दिल्लीत संसदेवर ही रिपब्लिकन पक्षाने धडक देऊन मागणी मंजूर केली. त्यामुळे इंदुमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. आंबेडकरी चळवळीच्या सर्व नेत्यांना संघटनांना निमंत्रण द्यायचे होते.

तसे न करता घाईत मुख्यमंत्र्यांनी एकटेच भूमीपूजन करण्याचा कार्यक्रम नियोजित केला होता का? मुख्यमंत्र्यांनी सर्वाना सोबत घेऊन काम करावे आकसबुद्धीने रिपब्लिकन नेत्यांना टाळून रिपाइं चे महत्व कमी होणार नाहीं असे गौतम सोनवणे म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदुमिल मधील पुतळ्याची उंची वाढवून त्यासाठी लागणारा जास्तीचा निधी ही उपलब्ध करून देऊन चांगले काम केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र जेव्हा केव्हा इंदुमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाला कार्यक्रम होईल तेंव्हा सर्वपक्षीय नेत्यांना रिपब्लिकन नेत्यांना सन्मानाने निमंत्रित करावे,” असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!