Share

मुंबईसह राज्यात दमदार! पावसाची पहाटेपासूनच बॅटिंग सुरु

Published On: 

मुंबई: राज्यात आजपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि मुंबईतही पावसाचा अंदाज आहे.

तर, मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. तर सोमवारी पहाटेपासून मुंबई उपनगरांतील विविध भागांत पावसाच्या सरी बसरत आहेत.

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रात्री १२ वाजता अजित दादांच्या खास शुभेच्छा!

गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. तर मंगळवारी 28 जुलै रोजी कोकण, गोव्यात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राजकीय गोंधळ राजस्थानात पडसाद उमटतात महाराष्ट्रात, कॉंग्रेसचे मुंबईत आंदोलन

त्याचबरोबर बुधवारी 29 तारखेला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.

भय इथले संपत नाही : देशात करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला १४ लाखांचा टप्पा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!