🕒 1 min read
नवी दिल्ली : जगभरात तसंच देशातही करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत देशातही करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रविवारी देशात करोनाबाधितांच्या संख्येनं १४ लाखांचा टप्पा ओलांडला. रविवारी मिळालेल्या माहितीनुसार देशात करोनाग्रस्तांची संख्या आता १४ लाख ११ हजार ९५४ वर पोहोचली आहे. covid19india.org ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशात ४ लाख ७७ हजार २२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ९ लाख १ हजार ९५९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत करोनामुळे ३२ हजार ३५० जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.
देशात करोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात रविवारी ६ हजार ४४ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. तर दुसरीकडे रविवारी राज्यात ९ हजार ४३१ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत २ लाख १३ हजार २३८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा दरही ५६.७४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात मृत्यूदर ३.६३ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार २९६ रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ७५ हजार ७९९ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते.
दरम्यान, दुसरीकडे राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घ्या – नरेंद्र मोदी
आज निदान झालेले ९४३१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६७ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०१ (५७), ठाणे- २१८ (१३), ठाणे मनपा-२९६ (१०), नवी मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३५८ (९),उल्हासनगर मनपा-७५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (२), मीरा भाईंदर मनपा-८१४३ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-२२२ (६), रायगड-३०९ (१२), पनवेल मनपा-१८२ (७), नाशिक-१०४ (१), नाशिक मनपा-३१९ (४), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-१४०, अहमदनगर मनपा-२७५, धुळे-४३ (१), धुळे मनपा-२१ (१), जळगाव-१३० (१३), जळगाव मनपा-२९ (२), नंदूरबार-७ (१), पुणे- ३७५ (१७), पुणे मनपा-१९२१ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-९०० (१०), सोलापूर-१७४, सोलापूर मनपा-१६८ (८), सातारा-१२० (१२), कोल्हापूर-१११ (२), कोल्हापूर मनपा-४३ (१), सांगली-१६, सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (३), सिंधुदूर्ग-७, रत्नागिरी-६२, औरंगाबाद-१०२ (१), औरंगाबाद मनपा-१६१ (८), जालना-४४ (१), हिंगोली-१ (१), परभणी-६ (१), परभणी मनपा-१०, लातूर-३७, लातूर मनपा-१५ (३), उस्मानाबाद-३७ (१), बीड-२६, नांदेड-२९, नांदेड मनपा-४१, अकोला-२४ (१), अकोला मनपा-२१ (१), अमरावती-१ (१), अमरावती मनपा-३६, यवतमाळ-९ (३), बुलढाणा-२५ (३), वाशिम-१६ (१), नागपूर-६८, नागपूर मनपा-११३ (२), वर्धा-१२ (१), भंडारा-२, गोंदिया-७, चंद्रपूर-१९, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-३(इतर राज्य १).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ नमुन्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८ हजार ४२० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६३ टक्के एवढा आहे.
आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न साकार होईल, सेवाग्राम आश्रमात राज्यपालांचा अभिप्राय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
