🕒 1 min read
मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत उपाययोजनांसाठी बैठक बोलावली आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत सतर्कतेचे आदेश दिले होते. याबाबत मुंबई पालिकेनेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता ही बैठक होणार आहे.
मागील पंधरा दिवसांत मुंबईत आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आवश्यक माहिती संकलित करावी, असे निर्देश मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसांतील केलेल्या प्रवासाची माहिती द्यावी, तसेच त्यांचा पासपोर्ट विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण काटेकोरपणे करावे असे निर्देश चहल यांनी संबंधित प्राधिकरणाला दिले.
महत्वाच्या बातम्या
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल


