🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
याच पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील हे नाशिक येथे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘भाजपने ३० वर्षे मातोश्रीच्या शक्तीचा वापर केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जोरावरच मोठे झालेल्या भाजप अन् त्यांच्या नेत्यांनी आता प्रस्तावाची भाषा करु नये,’ अशी टीका त्यांनी केली.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘ भाजपच्या बंडखोरांसोबत कुस्ती खेळून आम्ही निवडून आलोय, भाजपने आमच्याशी कुस्ती खेळून दाखवावी. हे सरकार किती दिवस चालेल याची काळजी त्यांनी करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले तरीही भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत आशावादी असल्याचं चित्र आहे. तसेच मुनगंटीवारांच्या भाजप- शिवसेना सत्तास्थापनेबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
