🕒 1 min read
औरंगाबाद : वॉर्ड क्रमांक ९८ कबीर नगर याठिकाणी कोरोनाच्या काळातही अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत आला आहे. प्रशासनाने हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. फक्त पार्सल सेवासुविधा सुरू आहेत. असे असूनही कबीर नगर मधील दारूच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. याठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकारांवर आळा बसवण्यात यावा यासाठी पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
कबीर नगर भागात गतवर्षी पासून दहशत पसरवून अवैधरित्या मद्य विक्री सुरु आहे. गतवर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाउन पासून ते आजतागायत या ठिकाणी रात्रंदिवस दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे वॉर्डातील महिला, मुली आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महिलांची छेडछाड आपापसात मारहाण शिवीगाळ असे प्रकार या ठिकाणी नितरोज घडतात. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
समाजाचे आर्थिक, मानसिक, शोषण थांबवावे अशी विनंती राष्ट्रवादी शहर पार्टीचे पश्चिम शहर उपाध्यक्ष अमोल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. अायुक्त निखील गुप्ता यांना हे सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- वीकेंड लॉकडाऊन : पुण्यात काय काय सुरु ? महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वाची माहिती
- वीकेंड लॉकडाऊन : पुण्यात काय काय सुरु ? महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वाची माहिती
- सरकारची आर्थिक परिस्थिती खालावली असेल, तर आम्ही मदत करू-प्रकाश आंबेडकर
- खासदार इम्तियाज जलील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
- अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
