Share

डब्ल्युटीसी फायनलमध्ये विल्यमसनच्या खेळण्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह

Published On: 

मुंबई : तीन दिवसानंतर इंग्लंडमध्ये भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवीला जाणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड संघ सज्ज आहेत. या सामन्याची उत्सुकता अंत्यत शिगेला पोहोचली आहे.

मात्र या सामन्यापुर्वी न्युझीलंडच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता. अद्यापही तो पुर्णपणे फीट नसल्यामुळे डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात खेळणार का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. न्युझीलंड संघाचा उपकर्णधार टॉम लँथमने याबाबत अपडेट दिले आहे. तो म्हणाला की, ‘केन विल्यमसन हा दुखापतीतुन सावरत आहे. त्याने सध्या विश्रांती करणे गरजेचे आहे असे त्याने सांगितले. आगामी एक-दोन दिवसात त्याची फिटनेस चाचणी होईल त्यांनतर निष्पन्न होईल की तो खेळणार अथवा नाही.’ असे टॉम लँथमने सांगितले.

यावेळी बोलताना टॉमने केन जर संघात आला तर आमचा संघ परिपुर्ण होईल असे सांगितले. तसेच त्याने संघ कोणत्याही एका खेळाडूवर निर्भर नसल्याचेही प्रतिपादन केले. इथपर्यंत आम्ही सांघीक कामगीरीच्या जोरावर पोहोचलो आहोत. असे तो म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनने माघार घेतली होती. तरीही या सामन्यात न्युझीलंडने चौथ्याच दिवशी इंग्लंडच्या संघाला पराभुत केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!