इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. आयसीसीच्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे 3 दिवसचं बाकी आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये असुन पुर्णपणे सज्ज झाले आहेत.
या सामन्यात रोहित शर्मा सोबत सलामीला कोण येणार, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. भारताकडे शुभमन गिल, मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल या खेळाडूंचा पर्याय आहे. परंतु, भारताने गिलला संधी दिली पाहिजे, असे इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसारला वाटते. इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची रोहितची ही पहिलीच वेळ असणार आहे.
‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामीला संधी दिली पाहिजे. सलामीवीर म्हणून रोहितची आता खरी कसोटी असणार आहे. रोहित स्वतःला सिद्ध करायला नक्कीच उत्सुक असेल. इंग्लंडमध्ये स्विंग होणाऱ्या चेंडूविरुद्ध दमदार कामगिरी करण्याचा आता त्याचा प्रयत्न असेल,’ असे पनेसार म्हंटला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम
- ‘या’ ठिकाणी दुसऱ्यांदा अतिक्रमणाचा प्रयत्न, मनपाच्या अतिक्रमण विभागाने हाणून पाडला!
- इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर
- ‘धर्माच्या भावनांशी खेळू नका’; राम मंदिर घोटाळ्याच्या आरोपांवर शिवसेना खासदाराचा इशारा
- ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

