🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. पण त्याआधी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांचे खेळाडू मुक्त करण्याची तसेच खेळाडूंचे दुसऱ्या संघांशी ट्रेडिंग करण्याची मुदत होती.
त्यानुसार सर्व संघांनी त्यांच्या मुक्त केलेल्या खेळाडूंची तसेच संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. सर्व ८संघांचे मिळून १२७ क्रिकेटपटूंना त्यांच्या संघांनी संघात कायम केले आहे. यामध्ये ३५ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
इंडियन प्रीमियर लीग आयपीएल २०२०च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणार आहेत. गेल्या हंगामात अजिंक्य रहाणे या संघाचा कर्णधार होता. पण स्पर्धेच्या अर्ध्यातच संघाच्या अपयशामुळे स्मिथला कर्णधारपद देण्यात आले होते.
स्मिथने मागील मोसमात कर्णधारपद स्विकारल्यानंतर राजस्थानला सलग चार सामन्यात विजय मिळवून दिले होते.राजस्थान रॉयल्स संघाने २०२०च्या आयपीएल मोसमासाठीही स्मिथलाच कर्णधार म्हणून कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रशिक्षक ऍडयू मॅकडोनाल्ड यांनी स्मिथच्या कर्णधारपदाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने यंदा काही खेळाडूंना करारातून मुक्त केले असून अॅश्टन टर्नर, ओशाण थॉमस, शुभम रांजणे, प्रशांत चोप्रा, ईश सोधी, आर्यमान बिर्ला, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी, लियाम लिव्हिंगस्टोन, सुदेश मिधून या खेळाडूंचा त्यात समावेश आहे.
तर संघात कायम केलेले खेळाडू स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रियान पराग, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमरर, वरुण ऍरॉन, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, अंकित राजपूत हे आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1196028536902971394?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1196025369972756484?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
