मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात एक भाषण केले. पवारांनी हिंदू देवदेवतांचे बाप काढले असा गंभीर आरोप करत सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर केला. पवारांनी जवाहर राठोड या कवीची एक कविता काय वाचून दाखवली आणि भाजपच्या लोकांच्या अंगावर जणू विंचवांची पिलावळच पडली. असे म्हणत शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली. आता या टीकेला भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, “बाळासाहेबांचं हिंदुत्व विज्ञानवादी पुरोगामी होते असं ‘सामना’वीरांनी अग्रलेखात म्हटलं आहे. आपल्या सोयीनुसार हिंदुत्वाची व्याख्या बदलणाऱ्या शिवसेनेला सत्तेसाठी शरद पवार जे बोलले त्याला समर्थन करण्याची वेळ आली आहे. जवाहर राठोड यांच्या कवितेत कुठेही साल्यांनो, तुमच्या मंदिरात आम्हाला प्रवेश नाही अशी विधानं नाहीत. कवितेची मोडतोड करून ती पुढे करायचं आणि त्याचं केविळवाणं समर्थन शिवसेनेला करावं लागतंय हे दुर्देवी आहे”.
“सामान्य कष्टकरी, शोषितांच्या भावना भाजपा जाणते, त्यामुळे केंद्रात ‘सबका साथ, सबका विकास’ २०१४ पासून आजपर्यंत लोकांच्या मनात नरेंद्र मोदींबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळे पुरोगामीचं सोंग करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेनं महाराष्ट्रात त्यांची जागा दाखवली. परंतु तुम्ही मोदींच्या नावावर निवडून आलात आणि मुख्यमंत्रिपदासाठी त्याच भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी केली. त्यांना सत्तेत बसवलं हे पाप जनता विसरणार नाही. असली, नकली, घंटाधारी, गदाधारी या हिंदुत्वाच्या व्याख्या त्यातूनच निर्माण होत आहेत. बाळासाहेबांनी कधीही मतांचे लांगूनचालन केले नाही. कधीही सत्तेसाठी विचारांची तडजोड केली नाही. मात्र तुम्ही सोयीस्करपणे त्यांच्या नावाचा वापर करताय हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहतेय” असा टोला केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

