टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा , स्विमिंग पूल, सिनेमागृह, नाट्यगृह, शॉपिंग मॉल्स येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. पण मात्र संपूर्ण लॉक डाऊन केल्यास नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाता येणार नाही.चीननंतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू केला आहे.तर जर्मनी आणि फ्रान्समध्येही संपूर्ण लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.
सध्या जीवघेणा कोरोना व्हायरस राज्यभर वेगाने पसरत असतांना त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासन कठोर उपाययोजना करणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ६४ वर्षीय पहिल्या रुग्णाचा १७ मार्चला मृत्यू झाला. आणि तो रुग्ण मुंबईत दाखल होता. त्यामुळे देशाच्या मुंबईत प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईत कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होतं.
लोकल आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती मिळते आहे. पण पुढचे ७ दिवस केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं.नागरिकांनी ई मेल मार्फत आपल्या तक्रारी कराव्यात असं आवाहन सरकार करणार आहे.
त्यामुळे केवळ गरज असेल अशाच परिस्थिती लोकांना घराबाहेर पडता येईल. लॉक डाऊनमध्ये केवळ अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते. ट्रेन, बस, हॉटेल, रेस्टॉरंट आणि रुग्णालयं वगळता सार्वजनिक सेवा बंद ठेवण्यात येतात. संचारबंदीसारखी परिस्थिती ओढवते.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी भारताकडे सध्या फक्त ३० दिवसांचा कालावधी आहे. भारतात सध्या कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे महत्त्वाचे आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लॉक डाऊन सारखे गंभीर उपाय भारताला करावे लागतील.


