Share

वादग्रस्त स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर रक्षा खड्सेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे.सध्या या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला असल्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, या  सर्व प्रकरणावर खासदार रक्षा खडसे यांनी भाष्य केले आहे. ”ज्यावेळी मला यासंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा मी वेबसाईट चेक केली. त्यावेळी असा कोणताही उल्लेख माझ्या नावासमोर नव्हता. ज्या लोकांकडून हे व्हायरल झालं आहे, ते पेज सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी असं आहे. याच पेजवरुन यासर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. कदाचित माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन हे केलेलं असावं, अशी माझी शंका आहे. मी एसपींना यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच पक्षालाही कळवलेलं आहे. त्यामुळे खरं नक्कीच पुढे येईल”.

”माझं यासंदर्भात काल एसपींसोबत बोलणं झालेलं आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत”. एबीपी माझाला त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!