Share

राज्यसरकारचा मोठा निर्णय, राज्यतील पहिले कोरोना रुग्णालय पुण्यात उभारणार

Published On: 

पुणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यसरकार वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. पण जर ही संख्या वाढतच गेली तर हे रुग्णालय पुरेसे ठरणार नाही. या दृष्टीने राज्यातील पहिले कोरोना रुग्णालय पुण्यातील ससून रुग्णालयात सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी ससून रुग्णालयाची नवी ११ मजली इमारत कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे.

पुणे शहरात १८, पिंपरी चिंचवड मध्ये १२, आणि राज्यतील इतर ठिकाणी मिळून कोरोना बाधितांचा आकडा आज (ता. २७) १३० वर पोहचला आहे. हि आकडेवारी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यसरकार ससून रुग्णालयाची ही इमारत केवळ कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात येत आहे. यात दिलासादायक बाब अशी की, काही कोरोनाबाधित रुग्णांची पुन्हा चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्नालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे.मात्र अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने देशातील 80 कोटी नागरिकांना दर महिन्याला प्रती व्यक्ती 27 किलो रुपयांचे गहू अवघ्या 2 रुपयांना आणि प्रती किलो 34 रुपये किंमतीचे असणारे तांदूळ फक्त 3 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याबाबत केंद्र सरकाने सर्व राज्य सरकारला तीन महिन्यांचा अॅडवान्स सामान खरेदी करण्याची सूचना दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!