Share

राज्य सरकारचा मोठा निर्णय : जिल्हाबाह्य एसटी वाहतुकीला राज्य सरकारची परवानगी

Published On: 

मुंबई- राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही असं राज्य परिवहन मंडळाने म्हटलं आहे.

एसटीचा प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची खबरदारी घ्यावी असेही या पत्रकात म्हटले आहे. याआधी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एसटी सुरू करण्यात आली होती. आता संपूर्ण राज्यभर एसटी धावणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीकडून आणि वाहनांकडून प्रवाशांची होणारी लुटमार थांबण्यास आळा बसेल. गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, गरिबांच्या हक्काच्या लालपरीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरिखीत झालं आहे. आता, सोशल डिस्टन्स आणि लॉकडाऊनचे नियम पाळून लालपरी पुन्हा रस्त्यावर लांब पल्ल्यासाठी धावणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!