Share

मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे नेते बदनाम करत आहेत : संजय राऊत

Published On: 

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘सुशांत सिंह केस सीबीआयकडे सोपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद. आता कडक ताशेऱ्यानंतर तरी गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करून त्यांच्या सह संबंधित पोलिसांची CBI चौकशी करावी. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता याची ही चौकशी व्हावी’. अस ट्विट करत भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

राजीनाम्याचा विषय निघाला तर प्रकरण दिल्लीपर्यंत जाईल, संजय राऊत आक्रमक

यावर, आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर देत गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा विषय निघाला तर प्रकरण दिल्लीपर्यंत जाईल. ते आमचे सरकारमधील मित्रपक्ष आहेत आणि गृहमंत्री आपली बाजू मांडण्यास सक्षम आहेत, ” अशी भुमिका संजय राऊत यांनी मांडली.

‘त्यांची मागणी आजोबांना आवडली कि नाही यापेक्षा कोर्टाने मान्य केली हे महत्वाचे’ : देवेंद्र फडणवीस

भाजपाकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवरून त्यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केले. “मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी तपास अत्यंत प्रामाणिकपणे केल्याची माझी माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे नेते बदनाम करत आहेत” असे राऊत म्हणाले.

उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण करणार-मुख्यमंत्री

दरम्यान, भाजपाचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे राहिले आहेत, याची जबाबदारी राज्य सरकार घेणार हा असा सवाल केला आहे. “पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!”  ‘ सिंघम ‘चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही?, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!