🕒 1 min read
नवी दिल्ली : इंधनाच्या किमतीत सलग सोळाव्या दिवशी दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल प्रतिलिटर 33 पैसे तर डिझेल 58 पैशांनी महाग झाले आहे. 16 व्या दिवशी किमती मध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरवड्यात पेट्रोल प्रतिलिटर तब्बल 9.21 रुपयांनी महाग झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या दोन आठवड्यांपासून सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक पुरते त्रासून गेले आहेत.
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 33 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव 79 रुपये 56 पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 58 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे दर प्रतिलिटर 78 रुपये 85 पैसे झाले आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत रविवारी पेट्रोलचा दर 86.04 रुपये प्रति लिटर तर डिझेल 76.69 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, आता या दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. नगरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकरी कार्यालया समोर शनिवारी वाढत्या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवून, करोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांचा विचार करुन दरवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
सध्याच्या काळात कामगार, कष्टकरी, शेतकरी यांना सर्वसामान्य कामासाठी दुचाकीची आवश्यकता असते. तसेच शेतीसाठी ट्रॅक्टर व छोट्या उद्योगांना लागणारी वाहने यांना देखील पेट्रोल व डिझेल मध्ये होणारी वाढ परवडणारी नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पेट्रोल व डीझेलचे वाढत्या दरावर नियंत्रण आणून दरवाढ कमी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; नेपाळ सीमेवर अतिदक्षतेचा इशारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर RBIची मोठी घोषणा, गृह-वाहन कर्ज होणार स्वस्त
अच्छे दिन गायबच ! सलग १४व्या दिवशी देखील पेट्रोल-डीझेलची दरवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
