टीम महाराष्ट्र देशा : लातूर येथे सोयाबीन प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी राज्याच्या फडणवीस सरकारनं लातूरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली समूहाला जमीन दिली आहे. तर ही जमीन भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र अनेक वर्ष झाली तरी राखीव जागेवर उद्योगसमूह उभारलेला नाही. त्यामुळे या राखीव जमिनीचा काही भाग पतंजली समूहाला दिल्याचं, वृत्त पीटीआयन प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, बाबांवर मेहरबानी दाखविल्यामुळे सरकारवर टीका होऊ लागली होती. पतंजली उद्योग समूहाला लातूर जिल्ह्यातल्या औसा इथली जमीन चार दिवसांत देण्यात आली या बातमीत काहीही तथ्य नसून, या उद्योग समुहाला अद्याप जमीन दिलेली नसल्याचं, राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत या समूहाला दिलेली नसल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
