पुणे : मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. मद्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे.
मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घेणे आवश्यक आहे. या उपाययोजनेमुळे मद्यप्रेमींचा रांगेत ताटकळत उभं राहण्याचा त्रास टळणार आहे
या संकेत स्थळावर ग्राहकाने सुरुवातीला आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे. त्यानंतर सदर टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधित दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.
दरम्यान मद्य विक्रीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यातील अनेक मद्य विक्री दुकांनावर गर्दी झाल्याचं पाहिला मिळालं. तळीरामांनी लांबच लांब रांगा लावत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच स्वागत केले . झालेल्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची भीती वाढू लागल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दारू विक्री बंद करण्यात आली. मात्र आता ई-टोकन आणून दारू विक्रीस शिस्त आणण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘कोरोना’मुक्ती लढ्यातील ‘परिचारिकां’च्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल
अफवांवर विश्वास ठेऊ नका ! केंद्र सरकार कोणाच्याही वेतनात कपात करणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

