नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाला आर्थिक फटका बसला आहे. तसेच देशाच्या तिजोरीतील देखील रक्कम घटली आहे. त्यामुळे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणार असल्याची माहिती सोशल मिडीयावर प्रसिद्ध होत आहे. मात्र ही माहिती चुकीची आणि निराधार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. याबबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले आहे.
अर्थमंत्रालयाने अधिकृत ट्विटवर वरून ही माहिती दिली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असून पूर्णपणे निराधार आहे,” असं अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.
There is no proposal under consideration of Govt for any cut whatsoever in the existing salary of any category of central government employees.
The reports in some section of media are false and have no basis whatsoever.@nsitharamanoffc @PIB_India @DDNewslive @airnewsalerts
— Ministry of Finance
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही. काही प्रसारमाध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असून पूर्णपणे निराधार आहे,” असं अर्थ मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर याआधी सरकारकडून केंद्र सरकार पेन्शन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या वरिष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच विधवा महिलांसाठी तीन महिन्यांची पेन्शन एकत्र देत असल्याचं जाहीर केल होतं.
महत्त्वाच्या बातम्या
#corona : राज्यात समूह संसर्गाला सुरवात, तसे पुरावे मिळाले असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
…शून्यापासून सुरू केलं आहे, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ ट्विट वरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

